मुंबई

मुंबईतील बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या प्रश्नांवर महापौरांकडे साकडे

CD

विविध मागण्यांसाठी बेरोजगार सेवा संस्थांनी घेतली महापौरांची भेट
सकारात्मक तोडगा काढण्याचे रितू तावडे यांचे निर्देश

घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) : मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनतर्फे बुधवारी (ता. २५) महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान संस्थेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन महापौरांना देण्यात आले. तसेच संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी व प्रश्न सविस्तरपणे मांडण्यात आले. या बैठकीदरम्यान महापौर तावडे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित उपायुक्तांना बोलावून बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचे प्रश्न समजून घेत त्यावर मार्ग काढण्याचे निर्देश दिले.
या वेळी उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेच्या अनुषंगाने नगरविकास विभाग व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीचा संदर्भ देत शासनाच्या जीआरनुसार बेरोजगार सेवा संस्थांना कोणती कामे देण्यात येणार, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील दत्तक वस्ती योजनेत होऊ घातलेल्या बदलांवर चर्चा करीत मोटार लोडिंगसाठी नियुक्त सहा कंपन्यांच्या कामांमध्ये एनजीओ पुरवण्याचे काम बेरोजगार व महिला सेवा सहकारी संस्थांना देण्यात यावे, तसेच सर्व वॉर्डमध्ये निविदा प्रक्रियेत सुसूत्रता राखावी, अशीही मागणी त्यांनी महापौरांकडे या वेळी केली.
मुंबई बँक व मिटकॉन यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे बेरोजगार व महिला सहकारी संस्थांना महापालिकेकडून गाळे व स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र शासनाच्या १० लाख रुपयांपर्यंतच्या विनानिविदा कामांच्या जीआरची अंमलबजावणी मुंबई महापालिकेत करण्यात यावी, यासाठी संबंधित सीआर मंजूर करण्यात यावा, असेही संस्थांच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी महापौर व उपायुक्तांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस मुंबई शहरातील ७० हून अधिक बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीचे आयोजन मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन लिमिटेडतर्फे करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब घाडगे, उपाध्यक्ष सुरेश भालेराव, सुनील चव्हाण, स्वप्निल फाटक, संतोष जाधव, अनिशा माजगावकर, हिराचंद्र सूर्यवंशी, अमोल खरात, सतीश सावर्डेकर, हृदयनाथ डोके, अनिल निकम, विजय शेलार, संदेश बल्लाळ, संबोधी कांबळे, विजय मोरे, विजय चाळेकर, अनंत भालेकर, बाळासाहेब मुढे यासह मुंबई शहरातील अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल; राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

Latest Marathi News Live Update : भोंदू खरातला ट्रम्पचा एडव्हायझर नेमला असता- देवेंद्र फडणवीस

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Virar News : गॅस टंचाईवर मात करत कळंब हॉटेल चालकाने बनवली टाकाऊ इंजिन ऑईलवर चालणारी शेगडी

SCROLL FOR NEXT