मुंबई

सूचक नाका परिसरात विजेच्या खांबावर आग

CD

सूचक नाका परिसरात विजेच्या खांबाला आग
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : कल्याण पूर्व भागातील वर्दळीच्या सूचक नाका परिसरात मंगळवारी (ता. २४) रात्री विजेच्या खांबावरील तारांनी अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीचे भीषण दृश्य समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सूचक नाका येथील एका गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबावर अचानक ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणातच तारांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा पाहून खांबाखाली उभ्या असलेल्या दुचाकींना झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ धाव घेत दुचाकी सुरक्षितस्थळी हलवल्या. सुदैवाने वेळीच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

स्थानिकांचा महावितरणवर संताप
घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महावितरणच्या कारभारावर रहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिसरात अनेक ठिकाणी जुन्या आणि लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिकांमुळे शॉर्टसर्किटच्या घटना वारंवार घडत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT