मुंबई

डिझेल दरवाढीवर हस्तक्षेप करावा

CD

डिझेल दरवाढीत हस्तक्षेप करावा
केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना नितेश राणे यांची विनंती
भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मच्छीमारांच्या सहकारी संस्थांचा घाऊक ग्राहकांमध्ये समावेश असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या डिझेलमध्ये प्रतिलिटर सुमारे २२ रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांना केली आहे.
आखाती युद्धामुळे तेल कंपन्यांनी घाऊक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात वाढ केली आहे. मच्छीमारांचा घाऊक ग्राहकांमध्ये समावेश केल्याने दरवाढीचा फटका बसला आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात १३६ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ७,५५० यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेलचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मच्छीमारांना तीव्र आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचा थेट परिणाम संपूर्ण राज्यातील मासेमारी व्यवसायाच्या शाश्वततेवर होत आहे. मच्छीमारांच्या सहकारी संस्थांचे घाऊक ग्राहक म्हणून वर्गीकरण केल्यामुळे मच्छीमारांना पेट्रोल पंपांवर डिझेल किरकोळ दराऐवजी अधिक महागड्या घाऊक दराने खरेदी करण्यास भाग पडत असल्याचे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.
-------------------------------
मच्छीमार संघटनांच्या मागण्या
केंद्र सरकारने मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करून त्यांना डिझेल किरकोळ दराने खरेदी करण्याची मुभा द्यावी, मासेमारी व्यवसायासाठी उद्दिष्टआधारित डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरणाची तरतूद करावी, कृषी क्षेत्राप्रमाणेच मासेमारी क्षेत्राचाही इंधन संरक्षण सहाय्य योजनेंतर्गत समावेश करून त्याला मान्यता द्यावी, मासेमारी क्षेत्रासाठी इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर एका धोरणाची आखणी करावी आदी उपाय करण्याची विनंती पत्रातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT