मुंबई

दादरमधील शेतजमिनी परत मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे महसूल मंत्र्यांकडे साकडे

CD

दादरमधील शेतजमिनी परत मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे महसूल मंत्र्यांकडे साकडे
लवकरच बैठक घेण्याचे मंत्री बावनकुळे यांचे आश्वासन
पेण, ता. २५ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दादर परिसरातील शेतजमिनी सुमारे अठरा वर्षांपूर्वी सेझ प्रकल्पासाठी भूसंपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रकल्प आजतागायत पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची जमीन परत मिळावी, या मागणीने आता जोर धरला आहे.
या पार्श्वभूमीवर दादर येथील ग्रामस्थांनी आमदार रविंद्र पाटील यांच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन सादर केले. रिलायन्स सेझ प्रकल्पासाठी जमिनी घेताना रोजगाराचे आश्वासन देऊन कवडीमोल दराने जमीन घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच प्रकल्प न उभारता सातबाऱ्यावर कंपनीचे नाव चढवण्यात आल्याने स्थानिकांची फसवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून जमीन त्यांच्या नावे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर सकारात्मक भूमिका घेत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT