मुंबई

भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी सिडकोकडून १२७ झाडांची कत्तल;

CD

सिडकोकडून १२७ झाडांची कत्तल
भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी प्रस्ताव; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप
खारघर, ता. २५ (बातमीदार) : खारघरमधील उत्सव चौक ते मेट्रो स्थानकादरम्यान उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी सिडकोकडून तब्बल १२७ झाडांची कत्तल केली जाणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
एमएसईडीसीएलच्या उच्च दाबाच्या वाहिन्या सुरक्षिततेच्या कारणास्तव भूमिगत करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. या कामासाठी रस्त्याकडेला असलेली अनेक वर्षांपासूनची झाडांची कत्तल अपरिहार्य असल्याचे सिडकोकडून सांगितले जात आहे. सिडकोच्या खारघर कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांकडून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे यासंदर्भात प्रस्ताव तयार करून जाहीर सूचनाही प्रसिद्ध केली आहे. या प्रकरणावर कार्यकारी अभियंता नंदकुमार कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जात असताना दुसरीकडे सिडकोकडून उभी झाडे तोडली जात असल्याने प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींसह नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

नागरिकांना हरकती व सूचना करण्याचे आवाहन
सिडकोच्या वृक्ष अधिकाऱ्यांनी २० मार्चला प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटीसमध्ये उत्सव चौक परिसरातील १२७ झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात खारघरमधील नागरिकांना २७ मार्चपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह
झाडांच्या कत्तलीसंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रात जाहिरात देणे अपेक्षित असताना सिडकोने स्थानिक स्तरावर कमी परिचित वर्तमानपत्रात जाहिरात दिल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या प्रकल्पासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, पर्यावरण विभागाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी खारघरवासीयांकडून होत आहे.

खारघर हे निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जाते. मात्र अशा शहरातील उभी झाडे तोडून विकास करणे योग्य नाही. या निर्णयाविरोधात आम्ही सिडकोकडे लेखी तक्रार करणार आहोत.
- ज्योती नाडकर्णी, पर्यावरणप्रेमी, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

Latest Marathi News Live Update : आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे; रुग्णवाहिकेतून थेट 'पंचायत समितीत' धडकत अनोखे आंदोलन

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Virar News : गॅस टंचाईवर मात करत कळंब हॉटेल चालकाने बनवली टाकाऊ इंजिन ऑईलवर चालणारी शेगडी

Horoscope : उद्या राम नवमीला बनतोय दुर्मिळ योग! पुढचे 6 दिवस 'या' 3 राशीच्या लोकांना हमखास धनलाभ; एका रात्रीत आयुष्यात घडेल मोठी घटना

SCROLL FOR NEXT