डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डबेवाल्यांना अधिकृत प्रवेश
विद्यार्थ्यांना घरचे सकस अन्न मिळणार; लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश
नेरूळ, ता.२५(बातमीदार)ःमुंबईतील १३५ वर्षांची विश्वासार्ह परंपरा जपणाऱ्या डबेवाल्यांच्या सेवेला नवी मुंबईत मोठे यश मिळाले आहे. नेरूळ येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डबेवाल्यांना अधिकृत प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
विद्यार्थ्यांना घरचे शुद्ध, सकस व पौष्टिक अन्न वेळेत मिळावे, यासाठी डबेवाल्यांना महाविद्यालय परिसरात प्रवेश व अधिकृत ओळखपत्र देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. या मागणीसाठी आमदार श्रीकांत भारतीय, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर सुजाता पाटील, नवी मुंबईचे नगरसेवक अमित पाटील (आरोग्य समिती सदस्य), नगरसेवक विशाल ससाणे यांनी विशेष पुढाकार घेत समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर यश मिळाले असून डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डबेवाल्यांना अधिकृत प्रवेश देण्यात आला आहे. महाविद्यालय परिसरात सुरक्षित वातावरण राखण्यासाठी यापुढे केवळ डबेवाल्यांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पोहोचवले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.