मुंबई

युद्धाच्या नावाखाली बाजारात दरवाढीचा खेळ

CD

तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीत अडथळे निर्माण आहेत. परिणामी स्थानिक बाजारपेठांत बटाटा आणि कांद्याच्या दरांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र प्रत्यक्षात घाऊक बाजारात दर घसरलेले असतानाही किरकोळ बाजारात ग्राहकांकडून जास्त दर आकारले जात असल्याचे चित्र आहे.

घाऊक व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, एपीएमसी बाजारात कांदा आठ ते १० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. बटाट्याचे दरही घाऊक बाजारात १० ते १२ रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत, मात्र किरकोळ बाजारात हाच कांदा २५ ते ३० रुपये प्रतिकिलो, तर बटाटा सुमारे २५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. घाऊक आणि किरकोळ दरांमधील या मोठ्या तफावतीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कांदा-बटाटा घाऊक व्यापारी दिगंबर राऊत यांच्या मते, निर्यातीत अडथळे आल्याने परत आलेल्या मालामुळे पुरवठा वाढला असून दर घसरले आहेत. घाऊक बाजारात कुठल्याही प्रकारची दरवाढ झालेली नाही. तसेच सध्याचे चालू दर हे अजून दोन महिने तरी वाढले जाणार नाहीत. एकंदरीत, आखाती युद्धाचा आधार घेत किरकोळ बाजारात दरवाढीचे समर्थन केले जात असले तरी प्रत्यक्षात घाऊक बाजारातील स्थिती स्थिर आहे. उन्हाळी साठवणुकीच्या पदार्थांमुळे किरकोळ बाजारात बटाटा अजून महाग होणार, या भीतीने महिला २५ रुपये किलो दराने बटाटे घेऊन वळवनीचे पदार्थ तयार करत आहेत.

आखाती युद्धाचे कारण
आखाती देशांतील युद्धामुळे किमती वाढणार असल्याचे कारण पुढे करून काही किरकोळ विक्रेते ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. प्रत्यक्षात मात्र बाजारातील स्थिती स्थिर असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

दोन महिने हलाखीचे
गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रीची आस्थापने बंद असल्याने बटाटा आणि कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. वडापाव, भजी, समोसे यांसारख्या पदार्थांच्या विक्रीवर परिणाम झाल्याने बाजारातील खप कमी झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या पुरवठ्यामुळे घाऊक बाजारात दर नियंत्रित राहिले आहेत. हे दर किमान दोन महिने असेच राहणार आहेत, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

SCROLL FOR NEXT