मुंबई

नवी मुंबई आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

CD

नवी मुंबई आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मेडिक्लेम, ईएसआयअभावी कर्मचाऱ्यांचा मृत्यू; कर्मचारी संघटनेचा आरोप
तुर्भे, ता २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
महापालिकेत दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या कर्मचाऱ्यांना ईएसआय व मेडिक्लेमसारख्या आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने आजार किंवा अपघाताच्या प्रसंगी योग्य उपचार घेणे कठीण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून मेडिक्लेम सुविधा मिळावी, ईएसआय सुविधा मिळावी, यासाठी गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे. मार्च २०२६मध्ये कर्मचारी योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू पावल्यास महापालिका आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही पालिका प्रशासनाला व पालिका आयुक्तांना दिला होता.
अलीकडेच मलेरिया विभागातील कंत्राटी कर्मचारी विवेक सावंत यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. महागड्या उपचारांसाठी आर्थिक मर्यादा असल्याने योग्य उपचार मिळू न शकल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सफाई विभागातील एका कर्मचाऱ्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT