ट्रक, बसची समोरासमोर धडक
वाडा-मनोर महामार्गावर भीषण अपघात
वाडा, ता. २५ (बातमीदार) ः वाडा-मनोर महामार्गावरील सापने फाटा येथे खासगी बसला ट्रक धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले आहेत.
बुधवारी (ता. २५) सकाळी झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कंचाड येथून वाड्याकडे निघालेल्या खासगी बसला वाड्याकडून मनोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने सापने फाटा येथील वळणावर धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने तीन ते चार तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातात बसचा चालक सद्दाम हुसेन त्याचा सहकारी शरद भोगले तसेच ट्रकचालक गोविंद कुमार जखमी आहे. त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने हा अपघात झाल्याचे ट्रकचालकाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.