मुंबई

नारिवलीत अखंड हरिनाम सप्ताह

CD

मुरबाड (वार्ताहर) : तालुक्यातील नारिवली येथे १९७७ मध्ये सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सुवर्ण महोत्सवी सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहे. यात चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, योगीराज महाराज गोसावी, भगीरथ महाराज काळे, जगन्नाथ महाराज पाटील, विश्वनाथ महाराज वारिंगे आदी कीर्तनकार संत साहित्याचा महिमा रसिकांसमोर मांडणार आहेत. तसेच ह.भ.प. राजाराम महाराज घावट यांचे संतश्रेष्ठ जगद्‍गुरू तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित संगीतमय चरित्र प्रवचन होणार आहे. तालुक्यातील विविध सप्ताह मंडळांचा सन्मानही करण्यात येणार आहे. रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत हा सुवर्ण महोत्सवी सप्ताह पार पडणार आहे. भाविकांनी संत-सज्जनांचा आशीर्वाद व श्रवणसुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नारिवली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT