मुंबई

ठाण्यात चार कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त

CD

ठाण्यात चार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
गुन्हे शाखेची कारवाई; तिघे अटकेत

ठाणे, ता. २५ ः ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत चार कोटी १२ लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या त्रिकूटाला ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक करत मोठी कारवाई केली. या कारवाईत चार कोटी १२ लाख ४० हजार रुपये किमतीचा दोन किलो ६२ ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आला आहे.
चरई परिसरात अमली पदार्थांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. सोमवारी (ता. २३) कोपरीतील सोहेल खान याच्याकडून एक किलो ५६ ग्रॅम, तर उल्हासनगरच्या रोहित सितापुरे याच्याकडून एक किलो सहा ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. पुढील तपासात राजेश हडावले यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्ज साखळीचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT