मुंबई

बेकायदा फेरीवाल्यांविरोधात मोहिमेची मागणी

CD

जुईनगर, ता. २५ (बातमीदार) : मुंबईत बेकायदा वास्तव्यास असलेल्या कथित बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आणि पोलिसांना आदेश दिले आहेत. आता नवी मुंबईतही अशीच मोहीम राबवण्याची मागणी पुढे येत आहे. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांनी या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या मते, नवी मुंबई महापालिकेने आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने या समस्येची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. शहरातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, गावांच्या प्रवेशद्वारांवर तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी तपासणी मोहिमा राबवून संशयित फेरीवाल्यांची शहानिशा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा तपासणीदरम्यान बेकायदा वास्तव्यास असलेले अनेक परदेशी नागरिक सापडू शकतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच स्थानिकांच्या उपजीविकेच्या संधीचे संरक्षण होईल, असे व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहूनच कोणतीही कारवाई व्हावी तसेच कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा काही सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे. या मागणीमुळे नवी मुंबईत राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगण्याची चिन्हे असून, येत्या काळात प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने व नवी मुंबई पोलिस आयुक्तालयानेही या गोष्टीचे गांभीर्य ओळखून शहरातील संवेदनशील ठिकाणी छापे मारून शहानिशा केली तर अनेक बांगलादेशी सापडतील, मात्र नागरिकांनीही यासाठी पुढे येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे.
- ॲड. नीरंत वासुदेव पाटील, नेरूळ, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT