ठाण्यात रामनवमीनिमित्त वाहतुकीत बदल
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) : शहरात गुरुवारी (२६ ) रामनवमीचा उत्साह सोहळा आणि मिरवणुका निघणार आहेत. विशेषतः खोपट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता, सायंकाळी ४ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक विभागाकडून काही मार्ग बंद करण्यात आले असून पर्यायी मार्ग खुले केले आहेत.
ठाणे स्थानकाकडून टॉवर नाका मार्गे सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच जीपीओकडून आनंद आश्रम मार्ग, खोपट सिग्नलकडे जाणारी सर्व वाहने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नरच्या दिशेने जाणारी वाहतूक, खोपट सिग्नल आणि गोकुळनगर येथून मीनाताई ठाकरे चौक (उथळसर) कडे जाणारा मार्ग या ठिकाणी प्रवेश बंदी असणार आहे. मिरवणुकीच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नागरिकांनी आणि वाहनचालकांनी बदललेल्या वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग
वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करता येणार आहे. खोपट सिग्नलवरून डावे वळण घेऊन कोलबाड नाका आणि मीनाताई ठाकरे चौक मार्गे पुढे जाता येईल. तसेच खोपट सिग्नलवरून उजवे वळण घेऊन चरई कट, अल्मेडा चौक आणि मीनाताई ठाकरे चौक मार्गे जीपीओ चौकाकडे जाता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.