बुडालेल्या व्यक्तीची ओळख पटली
बोईसर, ता. २५ (वार्ताहर) : लालोंडे ग्रामपंचायत हद्दीतील फुलाचा पाडा परिसरात सूर्या नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात पथकाला बुधवारी सकाळी यश आले. मुन्नालाल गुप्ता (वय ६०, रा. पवन विहार कॉम्प्लेक्स, नागझरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सूर्या नदी पुलाखाली आंघोळीसाठी गेलेली एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. घटनास्थळावरून मोबाईल फोन, शर्टमुळे ती व्यक्ती वॉचमन म्हणून कार्यरत असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ शोधमोहीम सुरू केली होती. अखेर बुधवारी सकाळी संबंधित व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.