मुंबई

राज्य सरकारने विधानमंडळात जाहीर झालेल्या ‘एसआयटी’बाबत श्वेतपत्रिका काढावी -

CD

‘एसआयटीं’बाबत श्वेतपत्रिका काढा
शिवसेना आमदार ॲड. अनिल परब यांची मागणी

मुंबई, ता. २५ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी बुधवारी (ता. २५) राज्य सरकारने गेल्या पाच अधिवेशनांमध्ये स्थापन केलेल्या विशेष तपास पथकांच्या (एसआयटी) स्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि त्यावर सविस्तर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी केली.

विधान परिषदेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान परब यांनी गेल्या विविध अधिवेशनांमध्ये विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या एसआयटींबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा प्रश्न उपस्थित केला. या एसआयटी स्थापन केल्या आहेत, मात्र त्यांचे अहवाल कधी सादर होणार आणि जर ते अद्याप उपलब्ध नसतील तर सरकारने या अधिवेशनासह मागील पाच अधिवेशनांमध्ये स्थापन झालेल्या सर्व एसआयटींबाबत स्पष्ट आणि पारदर्शक पाऊल उचलत श्वेतपत्रिका काढावी. त्या श्वेतपत्रिकेमध्ये सर्व एसआयटींची माहिती, त्यांची सद्यःस्थिती आणि आतापर्यंतच्या ॲक्शन टेकन रिपोर्टबाबत माहिती समाविष्ट असावी, अशी मागणी आमदार ॲड. अनिल परब यांनी केली.

‘एटीआर’ची मागणी
आमदार ॲड. अनिल परब यांनी निदर्शनास आणून दिले, की प्रत्येक एसआयटीकडून ॲक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) अपेक्षित असतो, मात्र गेल्या पाच अधिवेशनांमध्ये एकाही एसआयटीचा असा अहवाल सभागृहात सादर करण्यात आलेला नाही. म्हणूनच सरकारने आतापर्यंत किती एसआयटी स्थापन केल्या, त्यांचे निष्कर्ष काय आहेत आणि त्यांच्या ॲक्शन टेकन रिपोर्टची स्थिती काय आहे याबाबतची माहिती द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार ॲड. अनिल परब यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Bandh: २० मे रोजी देशभरात मेडिकल सेवा बंद! कारण काय, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या मागण्या नेमक्या काय?

स्मशानात राहणाऱ्या बाईला प्रसिद्ध अभिनेत्याने घरी आणून केलेली सेवा; मृत्यूसमयी तिने दिलेल्या आशीर्वादाने बदललं नशीब

Sangli Constable Bribery Case : न्यायालयीन कोठडी मिळवून देतो, सांगलीतील हवालदाराने आरोपीकडे मागितली लाच, आरोपीनेच पकडून दिलं रंगेहाथ

Kalyan Accident: दुर्दैवी! महापालिकेच्या कंट्राती कचरा गाडीखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, आईचा मन हेलावणारा टाहो

CharDham Railway News : बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला रेल्वे मिरज, सांगली मार्गे सुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT