सफाई कर्मचाऱ्यांवर उष्माघाताचे संकट
एक दगावला, दुसरा रुग्णालयात दाखल
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : रखरखत्या उन्हात स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होत आहे. दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाचा मेंदूच्या झटक्याने मृत्यू झाला, तर दुसऱ्या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांकडे कोणतीही विमा योजना नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार करताना नातेवाइकांचे हाल होत आहेत. याप्रकरणी महापालिकेतील कामगार संघटनांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईचा पारा ३७ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवला गेला आहे. अशा परिस्थितीतही महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करीत आहेत. मलेरिया विभागातील कंत्राटी कामगार विवेक सावंत यांना अचानक मेंदूमध्ये झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. केवळ पालिकेची ईएसआय सुविधा व मेडिक्लेम नसल्याने सावंत यांचा मृत्यू झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सफाई विभागातील जय भवानी कंत्राटदाराकडील रवी डांगळेलाही पक्षाघात झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
----
कायम कधी होणार?
नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये वर्षांनुवर्षे कंत्राटी कामगार काम करीत आहेत. आज ना उद्या प्रशासनामध्ये आपली सेवा कायम होईल, या आशेने या कामगारांनी १५ ते २५ वर्षे काम केले आहे. या कर्मचाऱ्यांना आजतागायत समान कामाला समान वेतन मिळालेले नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा वेतनामध्ये काम करावे लागत आहे. त्यांना ईएसआय सुविधा नाही, प्रशासनाकडून मेडिक्लेम सुविधाही दिली नसल्याची कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
------
आम्ही महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून मेडिक्लेम सुविधा मिळावी, ईएसआय सुविधा मिळावी, यासाठी गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहोत.
- रवींद्र सावंत, अध्यक्ष, महाराष्ट्र कर्मचारी युनियन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.