मुंबई

रिंगरोडवर आणखी किती जणांचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?

CD

रिंग रोड मृत्यूचा सापळा
सायकलस्वाराच्या मृत्यूनंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; नागरिक संतप्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : कल्याणच्या रिंग रोडवर मंगळवारी (ता. २४) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीनिवास तांदळे या सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि सुरक्षेच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. २६) सकाळी विविध सायकलिस्ट आणि रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. या वेळी रिंग रोडवर आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मॉर्निंग वॉक आणि सायकलिंगसाठी ओळखला जाणारा हा रस्ता आता ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहे. संध्याकाळनंतर या मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहने बेफाम वेगाने धावतात. अनेक तरुण येथे बाइक रेसिंग आणि वेगाच्या स्पर्धा लावतात, ज्याचा फटका निष्पाप नागरिकांना बसत असल्याचा आरोप सायकलिस्ट ग्रुपने केला आहे. मंगळवारीदेखील रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या कारने तांदळे यांच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली होती. या घटनेच्या निषेधार्थ सायकलिस्ट आणि रनर्स ग्रुपचे सदस्य एकत्र आले. या वेळी डॉ. रेहनुमा, संदेश परदेशी, संजय पाटील, आंतरराष्ट्रीय धावपटू दिलीप घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या
रिंग रोडवर तत्काळ स्पीड ब्रेकर आणि दिशादर्शक फलक बसवावेत.
ड्रंक अँड ड्राइव्ह आणि ओव्हरस्पीडिंग रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवावी.
रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या हटवून वाहतुकीतील अडथळे दूर करावेत.
संपूर्ण मार्गावर अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT