गॅसटंचाईवर देशी जुगाड
नालासोपाऱ्यात हॉटेल चालकाकडून शेगडीचा वापर
विरार, ता. २६ (बातमीदार) ः युद्धामुळे घरगुती, व्यावसायिक गॅसटंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. तर काहींचे बंद होण्याच्या मार्गावर आहेत; पण नालासोपाऱ्यातील हॉटेल चालकाने जुगाडातून गॅसटंचाईच्या संकटावर मात केली आहे.
इराण-इस्राईल युद्धामुळे मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावनिर्माण झाली आहे. युद्धाचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून घरगुती, व्यावसायिक गॅसचा तुटवडा भासू लागला आहे. एकीकडे गॅसच्या किमती गगनाला भिडल्या असताना गॅसपुरवठा होत नसल्यामुळे हॉटेल चालकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस तुटवड्यामुळे काहींनी चूल, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा पर्याय निवडला आहे. तर नालासोपाऱ्यातील रूणाल किणी यांनी टाकाऊ इंजिन ऑईल, स्वयंपाकघरातील खराब तेलावर चालणारी शेगडी हॉटेलसाठी तयार केली आहे.
-----------------------
१७०० रुपयांचा खर्च
व्यावसायिक गॅस शेगड्यांच्या हजारो रुपयांच्या किमती, सिलिंडरचा वाढता खर्च पाहता रूणाल यांनी १७०० रुपयांत स्वदेशी शेगडी उभी केली आहे. यामुळे इंधनाचा खर्च ७० ते ८० टक्क्यांनी कमी झाला आहे. तसेच नव्या तंत्रज्ञानाची जोड, पारंपरिक पद्धतींचा वापरातून संकटावर मात केली आहे.
-----------------------
काही दिवसांपूर्वी यूट्युबवर व्हिडिओ पाहिला होता. सुरुवातीला अनेक वेळा प्रयोग फसला; पण शेगडीच्या रचनेत बदल केल्यामुळे अखेर यश आले.
- रूणाल किणी, हॉटेलचालक, कळंब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.