मुंबई

गॅस दरवाढीवरून काँग्रेस आक्रमक

CD

गॅस दरवाढीवरून काँग्रेस आक्रमक

विक्रमगड, ता. २६ (बातमीदार) ः वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशातच केंद्र सरकारने घरगुती, व्यापारी गॅस सिलिंडरची दरवाढ केल्यामुळे काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.
वाढत्या महागाईबरोबर आता गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तालुका अध्यक्ष घनश्याम आळशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने तत्काळ दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे पूर्वीप्रमाणे १४ किलो वजन कायम ठेवावे, अशी भूमिका मांडण्यात आली. या वेळी विक्रमगडचे तहसीलदार यांच्याकडे विविध मागण्यांचे लेखी निवेदन देत केंद्र सरकारपर्यंत नागरिकांच्या भावना पोहोचवाव्यात, अशी विनंती करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चौधरी, सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा सीमा पोद्दार, रघु पाटील, चंदू विग्ने, शांताराम रहाणे, अरुण पागी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT