मुंबई

सातपाटी गाव मनोरंजनाचे केंद्र

CD

सातपाटी गाव मनोरंजनाचे केंद्र
जत्रोत्सवाला सुरुवात; खाद्यपदार्थांची रेलचेल

पालघर, ता. २६ ः तालुक्यातील सातपाटी गावातील जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. रामनवमीच्या रात्रीपासून सातपाटी गावात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून पुढील तीन दिवस मनोरंजन, करमणूक, खाद्यसंस्कृतीची मोठी रेलचेल राहणार आहे.
गावातील प्रवेशद्वारावरील राममंदिर भाविकांसाठी सजविण्यात आले आहे. प्रकाश सजावटीने मंदिर परिसरात लखलखाट आहे. याच भागात मैदानावर आकाशपाळणे, टोरा-टोरा, क्रॉस चक्री, शुझ चक्री, बोट पाळणा, ड्रॅगन ट्रेन अशा मनोरंजनात्मक बाबींसह जादूचे खेळ, मौत का कुआ, साहसी खेळ यात्रेकरूंसाठी उभारण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी यात्रा करमणुकीचे केंद्र ठरणार आहे. यात्रेत खाजा खाद्यपदार्थाला विशेष पसंती असल्याने करमणुकीसह खवय्यांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. तसेच खवय्यांसाठी चटकदार पदार्थांची चव चाखता येणार आहे.
-------------------------------
कोळीबांधवांचे श्रद्धास्थान
- पालघर तालुक्यातील देवस्थानाची स्थापना १८८१ मध्ये कोळी समुदायाने केली आहे. पुढे १९२५ मध्ये मंदिर कौलारू पद्धतीचे बांधले गेले. १९९२ मध्ये खऱ्या अर्थाने भव्य असे मंदिर लोकवर्गणीतून निर्माण केले.
- कोळी समुदायाचे श्रद्धास्थान आहे. मुंबईमधील कोळीवाडे, कोळीवस्त्या येथील मच्छीमार बांधव आवर्जून यात्रेला येत असतात. रामनवमीच्या दिवशी मंदिरामध्ये विश्वस्तांमार्फत पूजा केली जाते. दशमीच्या दिवशी मंदिरातून सकाळी रामाची पालखी गावभर फिरवली जाते.
-----------------------------
सिलिंडर टंचाईचा फटका
सातपाटीच्या रामनवमी यात्रेत व्यावसायिक गॅस सिलिंडर टंचाईचा फटका बसताना दिसत आहे. यात्रेदरम्यान खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आहेत; मात्र सिलिंडरच्या मर्यादित पुरवठ्यामुळे स्टॉलधारकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेक व्यावसायिकांवर गॅस मिळत नसल्याने पर्यायी इंधनाचा वापर करण्याची वेळ आली आहे. यामुळे खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT