तलवाडा केंद्रात मुलींचे लसीकरण
विक्रमगड (बातमीदार)ः विक्रमगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण कार्यक्रम नियोजनबद्धपणे पार पडला आली. या उपक्रमाअंतर्गत उपकेंद्र मेढी कार्यक्षेत्रातील मुलींचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांची पूर्वनोंदणी, वैद्यकीय तपासणी, लसीकरणानंतर आवश्यक निरीक्षण तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम, आशा सेविका तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत मोलाचे योगदान दिले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढणार असल्याने व्यापक मोहीम राबवण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.