मुंबई

अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

CD

अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
मुलुंडमधील घटना; आरोपी २४ तासांत जेरबंद

घाटकोपर, ता. १ (बातमीदार) : मुलुंड परिसरात अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करीत तत्पर कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी आशीष गौतम बनसोडे (वय २१, रा. बदलापूर पूर्व) यांची पूर्वीपासून ओळख होती. मंगळवारी (ता. २५) सकाळी ९ वाजता मुलगी कॉलेजसाठी मुलुंड येथे आली असता आरोपीने तिचा पाठलाग करून तिला अडवले.
या वेळी ‘तू माझ्याशी का बोलत नाहीस?’ असा जाब विचारत आरोपीने मुलीच्या गळ्यात पाठीमागून हात टाकला आणि लोखंडी कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलीचा मित्र मध्ये पडताच त्याच्या मानेच्या मागील बाजूस कोयत्याचा वार लागून तो जखमी झाला.
हल्ल्यानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पीडितेच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ७८, ३५१(३) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला २४ तासांत अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्यावर यापूर्वीही बदलापूर पोलिस ठाण्यात एनडीपीएससह इतर गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास मुलुंड पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT