मुंबई

‘भोंदूबाबा’ अशोक खरातविरोधात मालाडमध्ये ‘जोडोमारो’ आंदोलन

CD

भोंदूबाबा खरातविरोधात मालाडमध्ये जोड मारो आंदोलन
मालाड, ता. २६ (बातमीदार) : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात मालाडमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. आरपीआय (ए.) मालाड विधानसभा यांच्या वतीने मालाड स्टेशन परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला, की अशोक खरात याने शेकडो महिलांना कथितरीत्या स्वतःचे मूत्र पाजून अमानवी कृत्य केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ त्याच्या प्रतिमेला जोडे मारो करीत संताप व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन मालाड विधानसभा अध्यक्ष सुनील गमरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनकर्त्यांनी आरोपी अशोक खरात याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणातील इतर जबाबदार व्यक्तींवरही गुन्हे नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या निषेध आंदोलनात प्रकाश बनसोडे, आयुष सिंग, सत्यदेव बाबू चव्हाण, मालती कटाळे, अश्विनी गोसावी, मीना कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT