मुंबई

मुरबाड मुख्य बाजारपेठेत पार्किंगची दैना

CD

टोकावडे, ता. २६ (बातमीदार) : मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठेत दुचाकी पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येप्रकरणी किरण रामचंद्र दळवी यांनी नगराध्यक्ष मोहन गडगे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
बाजारपेठेतील अनेक दुचाकीचालक थेट दुकानांसमोर गाडी उभी करून इतर कामासाठी निघून जातात. परिणामी, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना चालण्यासाठीही पुरेशी जागा राहत नाही. यामुळे बाजारपेठेत सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तातडीने पार्किंगची सुविधा उपलब्ध होणे शक्य नसल्यास सम-विषम पद्धतीने पार्किंगचे नियोजन करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला आहे. यामुळे दुकानदार व ग्राहक या दोघांनाही दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद केले आहे. नगर पंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

मुरबाडच्या मुख्य बाजारपेठेत अनियंत्रित पार्किंगमुळे ग्राहक व दुकानदार दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीने तातडीने पार्किंगची व्यवस्था करावी किंवा सम-विषम पद्धत लागू करून वाहतूक सुरळीत करावी.
- किरण दळवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT