वज्रेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रिक्त अध्यक्षपदावर विधान परिषद सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
राज्य महिला आयोग ही केवळ एक घटनात्मक संस्था नसून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे व सन्मानाचे महत्त्वाचे केंद्र आहे. सद्यस्थितीत आयोगाला तळागाळातील महिलांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि त्यासाठी लढण्याची क्षमता असलेले नेतृत्व आवश्यक आहे. डॉ. मनीषा कायंदे यांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कारकिर्दीत महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या समजून घेत त्यांनी विविध स्तरांवर काम केले आहे. तसेच, मुंबई विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग महिला आयोगाच्या कामकाजासाठी होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
महिलांच्या प्रश्नावर प्रभावी काम
मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती आणि मुंबई पोलिसांच्या ‘महिला दक्षता समिती’वर काम करताना त्यांनी महिलांवरील अत्याचार, तसेच सार्वजनिक ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांवर आवाज उठवला आहे. विधान परिषदेतही महिलांशी संबंधित विषयांवर त्यांनी ठोस भूमिका घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. महिलांच्या हक्कांसाठी विविध आंदोलने व उपक्रमांमध्ये सहभाग घेत त्यांनी तळागाळातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केल्यास महिलांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल, असा विश्वास प्रमोद पवार यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.