मुंबई

खोपोली नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र. अनधिकृत टप-यावर बुलडोझर.

CD

खोपोलीत अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र
महावीर गार्डन–पाटणकर चौक परिसरात कारवाई; कडक पोलीस बंदोबस्तात सुमारे तीस टपऱ्या हटवल्या
खालापूर, ता.२५ (बातमीदार) : खोपोली नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र झाली असून शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर बुधवारी बुलडोझर फिरवण्यात आला. महावीर गार्डन ते पाटणकर चौक या परिसरात सुमारे तीस टपऱ्या हटवण्यात आल्या. संभाव्य विरोध लक्षात घेऊन यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहराच्या विकासाला आणि सौंदर्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.
यापूर्वी गगनगिरी आश्रम परिसरातील टपऱ्यांवरही कारवाई करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पाटणकर चौक ते महावीर गार्डन परिसरातील टपरी चालकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अतिक्रमण न हटवल्याने ही धडक मोहीम राबवण्यात आली.
चौकट
पर्यायी जागेचा प्रश्न अधांतरी
टपरी चालकांना पर्यायी कायमस्वरूपी जागा व मूलभूत सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निखिल पोळ यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, काही टपरी चालकांनी स्वयंरोजगार योजनेतून घेतलेल्या कर्जाचा मुद्दा उपस्थित करत नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाने या कर्जाशी नगरपरिषदेचा संबंध नसल्याचे स्पष्ट करत अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली आहे.

**फोटो - कडक पोलीस बंदोबस्तात अनधिकृत टपऱ्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bhandara News : साकोलीत वाघाचा थरार! उमरझरी शिवारात मिरची तोडणाऱ्या महिलेवर पट्टेदाराचा हल्ला; १० फूट फरफटत नेले, सुदैवाने जीव वाचला

जेवर विमानतळाचे मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन! 'नोएडाला येण्यास आधीचे मुख्यमंत्री घाबरायचे'; अंधश्रद्धेचा पाढा वाचत पंतप्रधानांचा विरोधकांवर प्रहार

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT