मुरबाड, ता. २६ (बातमीदार) : रस्त्याच्या कामादरम्यान जेसीबी मशीनमुळे महावितरणची वाहिनी तुटल्याने मुरबाड तालुक्यातील टोकावडे, सरळगाव, धसई आदी ग्रामीण भागातील वीजपुरवठा बुधवारी दुपारपासून खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते.
कल्याण-मुरबाड-माळशेज घाट रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम मुरबाड शहराजवळ सुरू आहे. या कामासाठी जेसीबीद्वारे रस्ता खोदताना महावितरणची वाहिनी तुटल्याने ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कंत्राटदाराने रस्ता खोदकामासाठी महावितरणची परवानगी न घेता तसेच पूर्वकल्पना न देता काम केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती वापरात अडचणी निर्माण झाल्या होत्या. दुकानदारांचे फ्रिज बंद पडल्याने आईस्क्रीम व थंड पेयांचे नुकसान झाल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. दुर्घटनेनंतर वाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता सुरेश तोरडकर यांनी दिली.
नुकसान भरपाईची मागणी
कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष आप्पा घरत यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.