मालमत्ता कराची अखेर दरवाढ
मिरा-भाईंदर पालिकेकडून अधिसूचना जारी
भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : मालमत्ता कराची वाढीव दराने आकारणीचा निर्णय सत्ताधारी भाजपने महासभेत घेतला; पण अर्थसंकल्पात प्रशासनाने ही दरवाढ समाविष्ट केली नव्हती. त्यामुळे महासभेने केलेली दरवाढ लागू होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना १ एप्रिलपासून नव्या मालमत्तांना वाढीव दरानुसार कर आकारणीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी सत्ताधारी भाजपने १ एप्रिलपासून नव्या मालमत्तांना होणाऱ्या कर आकारणीचे दर वाढविण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेतला होता; परंतु महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना आयुक्तांनी दरवाढीचा समावेश केला नव्हता, त्यामुळे दरवाढ बेकायदा असल्याने रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने दरवाढीसंदर्भातील जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.
--------------------------
२० कोटींची वाढ
- १ एप्रिलपासून नव्याने होणारी कर आकारणी वाढीव दराने केली जाणार आहे. ही वाढीव कर आकारणी केवळ नव्या मालमत्तांनाच लागू असून याआधी कर आकारणी झालेल्या मालमत्तांना लागू नाही, असे सूचनेत नमूद केले आहे.
- चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ३३४ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने नक्की केले आहे. आगामी वर्षात वाढीव दर नव्याने होणारी कर आकारणीमुळे २० कोटींची वाढ होण्याची माहिती आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.