मुंबई

ठाण्यात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

CD

ठाण्यात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या असून यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
सोमवारी (ता. २४) सायंकाळी मानपाडा परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा तिच्या आईसोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर ती घरातून निघून गेली. सुरुवातीला ती परत येईल, असा कुटुंबीयांना विश्वास होता; मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. तरीही मुलगी सापडली नसल्याने कोणीतरी आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करत पालकांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत, १६ वर्षीय मुलगी सोमवारी (ता. २४) दुपारी घरातून महाविद्यालयासाठी निघाली होती. परंतु, उशिर होऊनही ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी संपूर्ण परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला; परंतु मुलगी सापडली नाही. अखेर त्यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी अपहरणाचा संशय लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी मोठा आवाज; प्रा. लक्ष्मण हाके यांचे राज्य सरकारला आवाहन, समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाची हाक!

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

SCROLL FOR NEXT