मुंबई

श्रमजीवींनी स्वच्छतेचा आदर्श घडवला

CD

वज्रेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : सेवेचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवत श्रमजीवी संघटनेतर्फे दर महिन्याच्या २३ तारखेला राबवला जाणारा ‘सेवा दिन’ भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील श्रमजीवीबहुल भागात उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. गाव-पाड्यांपासून शासकीय कार्यालयांपर्यंत स्वच्छतेचा संदेश देत या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीची ठोस जाणीव निर्माण केली.

भिवंडी तालुक्यातील अंबाडी, चिंबीपाडा आदी ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये; तसेच आश्रमशाळांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत कार्यकर्त्यांसह महिला-पुरुष सभासद, युवक आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पंचायत समिती कार्यालयात आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी स्वतः शौचालय स्वच्छ करून ‘सेवा हीच सर्वोच्च मूल्य’ असल्याचा आदर्श कृतीतून दाखवून दिला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये सेवा भाव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. विवेक पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त २३ ऑगस्ट हा ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच प्रेरणेतून दर महिन्याच्या २३ तारखेला विविध सेवा उपक्रम राबवण्याची परंपरा संघटनेने जपली असून, यंदाही त्याचे प्रभावी स्वरूप पाहायला मिळाले. या उपक्रमातून स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि सेवा भाव यांचे महत्त्व अधोरेखित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT