मुंबई

ठाण्यात सलग अपघातांची मालिका

CD

ठाण्यात सलग अपघातांची मालिका
एका महिलेचा मृत्यू, तिघे जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन अपघातांच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या अपघातांमध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या एका ५४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी निष्काळजी वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
वर्तकनगर परिसरातील पोखरण रोड क्रमांक एक येथे १४ मार्च रोजी रात्री पूजा साबळे या आपल्या ८ वर्षांच्या मुलीसोबत अय्यप्पा मंदिरातून पायी घरी जात असताना, त्यांना भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला व हाताला दुखापत झाली असून अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. पूजा साबळे मंत्रालयात वर्ग २ च्या अधिकारी आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, रविवारी (ता. २२) माजिवाडा पुलाजवळ मोटारसायकलवरून जात असताना एका ट्रकने अचानक कट मारल्याने बदलापूर येथील मोटारसायकलस्वार सागर शेवाळे आणि त्याचा मित्र हर्ष पांगे हे दोघे खाली पडले. या अपघातात सागर शेवाळे यांना जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
तर, सोमवारी (ता. २३) जी. बी. रोडवरील सेंट झेवियर्स स्कूलसमोर रस्ता ओलांडताना पातलीपाडा येथील ५४ वर्षीय नीलम सिंह या वृद्ध महिलेला अनोळखी दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २४) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्या कापूरबावडी येथील आशापूर मंदिरातून दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती; मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

SCROLL FOR NEXT