मोफत बस प्रवासासाठी मुदतवाढ
वसई (बातमीदार)ः वसई विरार शहर पालिका परिवहन सेवेमार्फत महापालिका हद्दीतील राबवण्यात येणाऱ्या मोफत बस प्रवास योजनेला लाभासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी ३१ मार्चची अंतिम मुदत होती.
माजी परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी २४ मार्च रोजी स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी लाभार्थ्यांच्या अडचणी मांडताना योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानुसार महापौर अजीव पाटील यांनी महासभेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत लाभार्थ्यांच्या सोयीकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.