मुंबई

संस्कृत रंगभूमीचं पुनरुज्जीवन

CD

संस्कृत रंगभूमीचं पुनरुज्जीवन
‘धन्यो गृहस्थाश्रमः’चा दमदार ठसा, सोमय्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची नवी झेप
मुंबई, ता. २६ (बातमीदार) : संस्कृत भाषा आजच्या तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकते, हे सिद्ध करीत सोमय्या विद्याविहार विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ या नाटकातून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्र संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच सहभाग घेत त्यांनी ३३ नाटकांमधून तब्बल सहा पारितोषिके पटकावत लक्ष वेधले. आयआयटी मुंबईनेही या प्रयोगाची दखल घेत विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रण दिले आणि पी. सी. सक्सेना सभागृहात नाटक सादर करण्यात आले.
या नाट्यप्रयोगात के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ धर्मा स्टडीज आणि माया सोमय्या स्कूल ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्टससह विज्ञान व अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंतरविद्याशाखीय सहकार्यामुळे संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगीत आणि रंगमंचाचा अनुभव मिळाला, तर इतर शाखांतील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचा प्रत्यक्ष परिचय झाला. या प्रयोगामागे व्यापक शैक्षणिक दृष्टी आहे. विद्यापीठात लवकरच नाट्यशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार असून, त्याचा पूर्वरंग म्हणून हा प्रयोग सादर करण्यात आला. या अभ्यासक्रमात सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच नाट्य, नृत्य आणि संगीताचे प्रत्यक्ष सादरीकरण अनिवार्य असणार आहे. दरवर्षी एक संस्कृत नाटक सादर करण्याचा विद्यापीठाचा मानस असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहभाग घेण्याचे उद्दिष्ट आहे.
नाटकातून समकालीन विषयांच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक मूल्ये प्रभावीपणे मांडण्यात आली. हे नाटक सिच्युएशनशिप आणि लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या समकालीन विषयांच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक नातेसंबंध आणि गृहस्थाश्रमाची संकल्पना प्रभावीपणे मांडते. दिग्दर्शक डॉ. प्रसाद भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संस्कृत संवाद, उच्चार आणि अभिनयाचा सखोल सराव केला. या यशामुळे संस्कृत ही आधुनिक अभिव्यक्तीची प्रभावी भाषा ठरू शकते, हे अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती; मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

SCROLL FOR NEXT