मुंबई

भगव्या पताकांसंगे राम जन्माचा सोहळा

CD

तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात रामनवमीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध अष्टमीनिमित्त शहरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये आज (ता. २६) पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

बेलापूर, वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली इत्यादी भागांमध्ये विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा दुपारी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील विविध मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, रोषणाई आणि पारंपरिक देखाव्यांनी सजविण्यात आला होता. ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘प्रभू रामचंद्र भगवान की जय’ अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. दिवसभर भजन, कीर्तन, रामरक्षा पठण आणि नामस्मरणाचे कार्यक्रम पार पडले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्रीरामांचे दर्शन घेतले. या वेळी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप तसेच सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. शहरभर सर्वत्र भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

जयघोषाने चैतन्य
उपमहापौर दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी गाव येथील स्व. प्रेमनाथ पाटील चौकातील प्रभाग क्र. १८च्या भाजप मुख्य जनसंपर्क कार्यालयात श्रीरामनवमीनिमित्त दिवसभरात विविध धार्मिक उपक्रम पार पडले. नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका प्रीती भगत, सामाजिक कार्यकर्ते संदीप भगत यांनी सकाळी प्रभागातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी परिसरात प्रभू रामच्या जयघोषाने चैतन्य निर्माण झाले होते.

व्याख्यानातून जागृती
वाशी गाव येथील नगरसेवक जनसंपर्क कार्यालयाजवळ हिंदू संमेलन समिती, वाशी गाव आयोजित हिंदू व हिंदुत्वासह संघ यात्रा या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाणे विभागाचे सेवाप्रमुख अविनाश गव्हाणे यांचे, तर संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानाच्या प्रांत कार्यकारिणी सदस्या शीतल निकम यांचे स्वदेशी, पर्यावरण, समरसता, नागरिक अनुशासन आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवरील व्याख्यान सायंकाळी पार पडले.

गावामध्ये विविध कार्यक्रम
तुर्भे गावातील रामातनू माता मंदिरातदेखील राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी आधात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोपरी गावातदेखील श्री राम मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला. घणसोली गावातदेखील श्री राम जन्म उत्सवानिमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. दरवर्षीप्रमाणे रामनवमीनिमित्त सेक्टर-१९ ए येथील राजराजेश्वरी रणादेवी माता मंदिरात श्री रणादेवी माता मित्रमंडळाच्या वतीने श्री राम जन्मोत्सव उत्साहात पार पडला. ह.भ.प. साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती (रा. देवाची आळंदी) यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT