मुंबई

गॅस संकटामुळे हॉटेल - मेस बंद; व्यावसायिक अडचणीत

CD

पालेभाज्यांच्या भावात घसरण
गॅस संकटामुळे खाणावळी बंद; व्यावसायिक अडचणीत
जव्हार, ता. २६ (बातमीदार)ः जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यभरात गॅसपुरवठा विस्कळित आहे. जव्हार शहरातील हॉटेल उद्योग, खाणावळींवर झाला असून, भाजीपाल्याची मागणी कमी झाल्याने शेतमाल कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
फेब्रुवारीत कडक उन्हाळ्याची चाहूल लागते. विहिरी, कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट होत असल्याने कमी पाण्यावर येणाऱ्या पालेभाज्यांची ग्रामीण भागात लागवड केली जाते. सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने कृषी बाजारावर थेट परिणाम झाला आहे. जव्हार शहरातील गॅसअभावी हॉटेल्स, खाणावळी बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात जाणाऱ्या पालेभाज्यांच्या मागणीत मोठी घट झाल्याने आवक वाढली असताना मागणी घटल्याने भाव कोसळले आहेत.
-----------------------
कोथिंबीर ५० रुपयांवर
उन्हाळ्यात कोथिंबिरीला सोन्याचा भाव मिळतो, मात्र यंदा बाजारपेठ थंडावल्याने अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या वर्षी ४०० ते ५०० रुपये प्रति क्रेट भाव मिळणारी कोथिंबीर ५० रुपयांवर आली आहे. गवार, भेंडी व वांगी यांचीही अशीच स्थिती आहे. गेल्या उन्हाळ्यात गवार, भेंडीस पाव किलोमागे ४० रुपये दर होता. तोच दर यंदा किलोमागे मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
-------------------------------
उन्हाळ्यात पालेभाज्यांना चांगला दर मिळेल अशी आशा होती. पण शहरात हॉटेल बंद असल्याने शेतातील माल कवडीमोल झाला आहे. सरकारने गॅसपुरवठा सुरळीत करून बाजाराला गती द्यावी अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होईल.
- रवि गवते, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती; मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

SCROLL FOR NEXT