वसईनगरीत श्रीरामाचा जयघोष
मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
वसई, ता. २६ (बातमीदार) ः तालुक्यात रामनवमीचा उत्साह दिसून आला. या वेळी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रामनवमीनिमित्त खोचिवडे, रमेदी, सोपारा, रानगाव, अर्नाळा, वर्तक मार्ग विरारसह परिसरातील राम मंदिरात विविध धार्मिक उपक्रम करण्यात आले. तर कुंभार वाडा, विरार गस कोपरी, टीवरी येथील सनटेक उत्सव समितीतर्फे भजन, कीर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अर्नाळा येथे कार्यक्रमात कोळी महिलांची गर्दी लक्षणीय होती.