मुंबई

प्लास्टिवर्ल्ड २०२६ची यशस्वी सांगता

CD

प्लास्टिवर्ल्ड २०२६ची यशस्वी सांगता
४७ देशांतील खरेदीदारांचा सहभाग; ६० कोटींचे व्यवहार निश्चित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. २६ ः ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ या २३ ते २५ मार्चदरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आयोजित बी-२-बी प्रदर्शनाची बुधवारी यशस्वी सांगता झाली. या प्रदर्शनात जागतिक खरेदीदार, भारतीय एमएसएमई आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज एकत्र आले होते. सध्या जागतिक प्लास्टिकच्या तयार उत्पादनांचा व्यापार सुमारे १.३ ट्रिलियन डॉलर असून, भारताचा त्यातील वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. पुढील तीन वर्षांत हा वाटा वाढवून ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी हे प्रदर्शन प्रभावी व्यासपीठ ठरले.
तीन दिवसांच्या या प्रदर्शनात १००हून अधिक भारतीय प्रदर्शकांनी विविध प्लास्टिक उत्पादने सादर केली. ४७ देशांतील २१० हून अधिक खरेदीदारांनी यात सहभाग घेतला. त्यांत १६०पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि ५० हून अधिक स्रोत एजंट व संस्थात्मक खरेदीदारांचा समावेश होता. रिलायन्स रिटेल आणि आयकियासारख्या प्रमुख भारतीय रिटेल कंपन्यांनीही यात सहभाग नोंदवला. ‘एआयपीएमए’ आणि ‘एफआयइओ’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनादरम्यान सुमारे ४,००० पूर्वनियोजित बी-२-बी बैठका झाल्या, तर २६ विशेष बैठकाही विविध कक्षांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक बैठक १५ मिनिटे चालली आणि प्रदर्शकांच्या स्टॉलवरही विस्तृत चर्चेसाठी नेटवर्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या प्रदर्शनातून सुमारे ६० कोटी रुपयांचे व्यवहार निश्चित झाले आणि ८०० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. प्रत्येक प्रदर्शकाला सरासरी २० ते २५ दर्जेदार व्यावसायिक संधी खुल्या झाल्या आणि यातून या व्यासपीठाचा प्रभाव लक्षात येतो.
या वर्षीच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारत-न्यूझीलंड बिझनेस कौन्सिलने ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स’ तसेच ‘ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण करार केले.

द्विराष्ट्रीय व्यापाराला चालना
या करारांमुळे द्विराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार असून, आगामी मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारतीय निर्यातदारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच काही क्षेत्रांमध्ये शुल्क सवलती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘प्लास्टिवर्ल्ड’मुळे उद्योग संघटनांमध्ये सहकार्य वाढल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

SCROLL FOR NEXT