सापणे गावात आगीचे लोट
टायर कंपनीतील बॉयलरचा स्फोट
वाडा, ता.२६ (बातमीदार)ः वाडा तालुक्यातील सापणे बुद्रुक येथील ‘बालाजी ग्रीन’ टायर कंपनीतील बुधवारी रात्री आग लागली. या दुर्घटनेत बॉयलरचा स्फोट झाल्याने कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज मोठा होता आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर वेढला. कंपनीच्या बाहेर उघड्यावर साठवलेले टायरमुळे आग आणखीणच भडकली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. टायरपासून ऑइल काढणाऱ्या अशा कंपन्या आधीच मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. काळा धूर, तीव्र दुर्गंधी, रासायनिक परिणामांमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पण अशा अपघातांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.