मुंबई

परळ स्थानकातील आधुनिक स्वच्छतागृहात सुविधांचा अभाव

CD

परळ स्थानकातील आधुनिक स्वच्छतागृहात सुविधांचा अभाव
पाण्याअभावी दुर्गंधी; रुग्ण, प्रवाशांना मोठा त्रास
मुंबई, ता. २६ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील परळ स्थानकाचा अलीकडेच कायापालट करण्यात आला असला तरी प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या आधुनिक स्वच्छतागृहात मूलभूत सुविधांचा अभाव गंभीर प्रश्न ठरत आहे. पूर्वीचे फलाटावरील स्वच्छतागृह स्थानकाबाहेर हलवण्यात आले असून, परळ पूर्वेला काही महिन्यांपूर्वी आधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. बाहेरून आकर्षक आणि स्वच्छ दिसणारे हे स्वच्छतागृह सुरुवातीला दीर्घकाळ बंद होते. दैनिक ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ते सुरू करण्यात आले.
सध्या स्वच्छतागृहातील सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विशेषतः पुरुषांच्या लघुशंकेसाठी बसविण्यात आलेली आधुनिक पाण्याची व्यवस्था कार्यरत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अनेकदा पाणीच उपलब्ध नसल्याने स्वच्छतेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. परिणामी प्रवाशांना नाइलाजाने नाक दाबून स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे.
परळ स्थानकातून वाडिया, केईएम, टाटा आणि गांधी रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणावर रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांची ये-जा असते. अशा वेळी स्वच्छतागृहातील गैरसोयींमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या हे स्वच्छतागृह मोफत असले तरी आवश्यक सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
आधुनिक स्वच्छतागृह नको, पण किमान आवश्यक सुविधा असलेले साधे स्वच्छतागृह तरी द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

फोटो ओळ; पाणी नसलेले व अस्वच्छ स्वच्छतागृह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT