मुंबई

भिवंडी पालिकेत ‘नोंदवही’चा मुद्दा ऐरणीवर

CD

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेतील प्रशासकीय कामकाजात अनियमितता वाढल्याचा आरोप करत प्रत्येक विभागात अधिकारी व अभ्यागतांसाठी नोंदवही ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
मागील चार वर्षांतील प्रशासकीय राजवटीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात शिस्तीचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या १ ते ५ प्रभाग समिती कार्यालयांसह एकूण २८ विभागीय कार्यालये अशी ३३ कार्यालये कार्यरत आहेत. येथे नागरिक व कामगार संघटनांचे प्रतिनिधी विविध कामांसाठी येत असतात. मात्र, अनेक वेळा संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याची तक्रार आहे. कर्मचारी अनुपस्थित असताना ते नेमके कुठे गेले याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वसुलीसाठी गेले आहेत, साइटवर आहेत किंवा बैठकीला गेले आहेत, अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली जाते. परिणामी, नागरिकांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागत असून त्यातून मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय, नागरिकांसाठी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भेटीची वेळ निश्चित असतानाही त्या वेळेत विभागीय बैठका घेतल्या जात असल्याने नागरिकांची कामे प्रलंबित राहतात. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हालचाल रजिस्टर सक्तीने ठेवून त्यामध्ये नियमित नोंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भानुदास भसाळे व सचिव श्रीपत तांबे यांनी केली आहे. तसेच प्रत्येक विभागात अभ्यागतांसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास कर्णकार यांनी केली आहे.

नियमांना तिलांजली
सरकारच्या नियमांनुसार प्रत्येक सरकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हालचाल रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र नोंदवही असणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेच्या बहुतांश विभागांमध्ये अशा नोंदी ठेवण्याची प्रणाली अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी रजिस्टर असले तरी त्यामध्ये नियमित नोंदी केल्या जात नसल्याचीही बाब समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT