मुंबई

मातृभाषेतून शिक्षण : सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र

CD

मातृभाषेतून शिक्षण : सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र
चुनाभट्टीत पालक, विद्यार्थ्यांसाठी उद्‍बोधक व्याख्यान; मराठी शाळा वाचवा अभियानाला प्रतिसाद
मुंबई, ता. २६ (बातमीदार) : मातृभाषेतून शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन असल्याचा मुद्दा अधोरेखित करीत चुनाभट्टी येथील एमएसके प्राथमिक विद्यालयात ‘मातृभाषेतून शिक्षण : सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘सकाळ एनआयई’च्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमाला सुमारे ३०० पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या हव्यासापोटी दरवर्षी शेकडो मराठी भाषिक शाळा बंद पडत आहेत. मुंबईत तर ही अवस्था फारच बिकट झाली आहे. अशा वेळी चुनाभट्टीच्या एमएसके प्राथमिक विद्यालयाने ‘मराठी शाळा वाचवा’ अभियान सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘सकाळ एनआयई’च्या सहकार्याने शाळेच्या सभागृहात नुकताच ‘मातृभाषेतून शिक्षण : सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र’ या विषयावर पालक, विद्यार्थ्यांसाठी उद्‍बोधक व्याख्यान पार पडले. यासाठी एकनाथ आव्हाड यांना आमंत्रित करण्यात आले.
चीन, जपान, जर्मनी यांसारख्या देशांनी मातृभाषेच्या जोरावर केलेली प्रगती त्यांनी उदाहरणांद्वारे स्पष्ट केली. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे पालक-मुलांमधील संवाद कमी होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या सचिव प्रणिता भारती उपस्थित होत्या. ‘सकाळ एनआयई’चे मुंबई विभाग व्यवस्थापक दिनकर कोकीतकर हे स्वतः ‘मराठी शाळा वाचवा’ अभियानात सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन मुख्याध्यापिका संगीता सरमळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT