मुंबई

सव्वादोन लाख ठाणेकर प्रतीक्षायादीत

CD

सव्वादोन लाख ठाणेकर प्रतीक्षा यादीत
दोन सिलिंडर ग्राहकांचा गॅस नोंदणीचा कालावधी ३५ दिवसांवर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरसह व्यावसायिक गॅस सिलिंडरची प्राधान्यक्रमानुसार विक्री करण्यात येत आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्यात काही बदल केले असून यामध्ये दोन सिलिंडर असलेल्या ग्राहकांसाठी पूर्वी २५ दिवसांचा वेटिंग कालवधी होता. तो आता ३५ दिवसांचा केला आहे. तर, एक सिलिंडर असलेल्या ग्राहकांसाठी २५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असल्याची माहिती शिधावाटप विभागाने दिली आहे; मात्र ठाणे जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी थेट सव्वादोन लाखांच्या आसपास गेल्याची माहिती समोर आली आहे.

इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यातील युद्धामुळे खनिज तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे देशातील अनेक राज्यांतील गॅसपुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. गॅस मिळविण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत; मात्र जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असून ग्राहकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे शिधावाटप कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलिंडर मागील काही दिवसांपासून पूर्णत: बंद ठेवले आहेत. त्यामुळे हॉटेल्स व्यवसायिकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच ठाणे ‘फ’ परिमंडळात ७२ गॅस एजन्सीच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलिंडर वाटपासाठी प्राधान्यक्रम ठरवून दिला असून काळाबाजार रोखण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा सुरू आहे. गॅस सिलिंडरबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे व नागरिकांमध्ये गॅस सिलिंडरबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे बुकिंगची संख्या वाढली आहे. तसेच दोन सिलिंडर असलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून ३५ दिवसांचा केला आहे. असे असले तरी, ग्राहकांनी घाबरून न जाता चिंता करण्याची आवश्यकता नाही.
- प्रशांत काळे, उपनियंत्रक शिधावाटप, फ परिमंडळ, ठाणे

ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. पुरेशा प्रमाणात गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध असून नागरिकांची चिंता करू नये. व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत ज्या शासनाकडून सूचना व निर्देश प्राप्त झाले आहेत, त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- सर्जेराव म्हस्के पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT