मुंबई

प्रदूषणाविरोधात बेमुदत साखळी उपोषणाची हाक

CD

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगर परिषद हद्दीतील एमआयडीसी परिसरात वाढत चाललेल्या रासायनिक उद्योगांमुळे हवा आणि पाण्याचे प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, श्वसनाचे आजार, त्वचारोग तसेच इतर गंभीर समस्या वाढत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त भारत पक्षाने बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाची घोषणा केली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धांत शिरसाट यांनी यासंदर्भात माहिती दिली. संयुक्त भारत पक्षाच्या वतीने ३० मार्चपासून कुळगाव-बदलापूर नगर परिषदेसमोर हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. सर्व रासायनिक कंपन्यांचे तत्काळ पर्यावरणीय लेखापरीक्षण, प्रदूषणकारी उद्योगांवर कठोर कारवाई आणि धोकादायक उद्योगांचे शहराबाहेर स्थलांतर करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय २४x७ हवा व पाणी गुणवत्ता मोजणी केंद्र उभारणे, रात्री होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, आपत्ती व्यवस्थापनासह गॅस अलर्ट प्रणाली सुरू करणे, नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, प्रदूषण तक्रार मदतवाहिनी सुरू आणि संयुक्त नागरिक-प्रशासन समिती स्थापन करणे यांचाही समावेश आहे. तसेच उद्योगांचे स्थलांतर होईपर्यंत कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि सर्व कंपन्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे बदलापूरमधील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

Latest Marathi News Live Update : करमाळा शहरात इंधन टंचाई; एचपी पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे लागले फलक

SCROLL FOR NEXT