उल्हासनगर, ता. २६ (बातमीदार) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू अरुण आशान यांच्यावर उल्हासनगर महापालिकेच्या शिवसेना गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचे उद्घाटन कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, माजी आमदार पप्पू कलानी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, माजी महापौर लीलाबाई आशान, राजश्री चौधरी, सरला आशान यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे गोपाळ लांडगे यांनी सांगितले. नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी हे कार्यालय सदैव खुले राहील. शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार अरुण आशान यांनी व्यक्त केला. या वेळी ठाणे जिल्हाध्यक्ष मोनू पवार, प्रवक्ता सोनू पवार, नगरसेविका सुरेखा सोनवणे, नगरसेवक विकास खरात तसेच प्रा. सुरेश सोनवणे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.