मुंबई

श्रीगाव येथील मराठी शाळेचे नूतनीकरण

CD

श्रीगाव येथील मराठी शाळेचे नूतनीकरण
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील मराठी शाळेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. जेएसडब्ल्यू फाउंडेशन व जेएसडब्ल्यू लिमिटेड, डोलवी-पेण यांच्यामार्फत हे नूतनीकरण केले. यानिमित्त श्रीगाव नाक्यापासून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या नूतनीकरणामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. या कार्यक्रमाला कंपनीचे कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


संजीवनी आरोग्य सेवा संस्थेतर्फे २९ मार्चला मोफत नेत्रचिकित्सा शिबिर
मुरूड (बातमीदार) ः मुरूड-जंजिरा येथील अंजनाबाई पुंडलिकराव लहाने हेल्थ ॲण्ड केअर सेंटर येथे रविवार (ता. २९) मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. मुंबईतील मनोरमा नेत्रालय आणि रघुनाथ नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार असून, डॉ. रागिणी पारेख,
रॅटीना तज्ज्ञ डॉ. सायली वाघमारे, कॅन्सर सर्जन डॉ. सुमित लहाने आणि त्यांचे सहकारी डॉक्टर तपासणी करणार आहेत. या शिबिराकरिता संजीवनी आरोग्य केंद्रात नावे नोंदवावीत, असे आवाहन कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी केले आहे.


श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्टस् असोसिएशन विजयी
पोयनाड (बातमीदार) : श्रद्धांजली चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्टस् असोसिएशनच्या संघाने स्पर्धेत विजयी होण्याचा मान मिळवला. पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (ता. २२) पेण स्पोर्टस् अससोसिएशन विरुद्ध अथर्व इलेव्हन संघात रंगला. यात पेणच्या संघाने अथर्व इलेव्हन संघाचा ४८ धावांनी पराभव केला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उद्योजक अतुल वनगे आणि उद्योजक राजू पिचिका उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पेण स्पोर्टस् अससोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सभासदांनी परिश्रम घेतले.

वळक येथे जलकुंड कामाचे भूमिपूजन
पेण (वार्ताहर) : रायगड जिल्हा वार्षिक योजना डीपीडीसीअंतर्गत जलसंधारणासाठी जलकुंड कामाचे भूमिपूजन वळक येथील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांच्या शेतावर उपसभापती संजय डंगर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २४) केले. पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी जलकुंडाबाबत शेतकऱ्यांना अनेकदा तांत्रिक मार्गदर्शन करून कमी जमीन धारणा असणाऱ्या लहान शेतकऱ्यांना जागेअभावी मोठ्या शेततळ्याचा लाभ घेता येत नव्हता. त्यांना जलकुंडाच्या माध्यमातून शेततळे वरदान ठरणार आहे. एका जलकुंडात सुमारे ५२ हजार लिटर पाणी साठवू शकतो. या योजनेत शेतकऱ्यांचा शाश्वत आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, उप कृषी अधिकारी प्रीती पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षता जाधव, सोनाली मोरे, बलवली ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर घरत आदींसह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT