मुंबई

दगडाने ठेचून हत्याप्रकरण उघड

CD

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प १ मधील शिवनेरीनगर परिसरात सोमवारी घडलेल्या प्रवीण वर्मा या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी शुभम पाटील ऊर्फ पप्प्या याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याने तपासाला गती मिळाली आहे.
प्रवीण वर्मा यांच्या डोक्यात सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दगडाने प्रहार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला वेग देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विविध पथकांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभमला ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT