मुंबई

ठेकेदारांचे उपोषण स्थगित

CD

ठेकेदारांचे उपोषण स्थगित
आमदार थोरवे यांच्या आश्वासनानंतर निर्णय; थकीत देयके एप्रिलपासून देण्याचे संकेत
कर्जत, ता. २६ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील ठेकेदार असोसिएशनचे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. उपोषणकर्ते राहुल डाळिंबकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रस घेऊन उपोषण सोडले. यावेळी सा.बा. विभाग पनवेलचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दीड वर्षांपासून सुमारे २०० कोटी रुपयांहून अधिक देयके थकीत असल्याने ठेकेदारांनी २५ मार्चपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. प्रलंबित बिलांमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची त्यांनी व्यथा मांडली होती.
दरम्यान, कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी एप्रिलपासून थकीत रक्कम देण्यास सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच आमदार थोरवे यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडण्याचे सांगितले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून ठेकेदारांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

Lonavala News : एकवीरा देवीचा पालखी सोहळा जल्लोषात; कार्ला गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी, उत्साहाला उधाण

Latest Marathi News Live Update : करमाळा शहरात इंधन टंचाई; एचपी पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे लागले फलक

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं सीक्रेट चॅट फीचर; मेसेज वाचल्यावर आपोआप होणार डिलीट, पाहा कसं वापरायचं?

SCROLL FOR NEXT