मुंबई

रोह्यात मुख आरोग्य शिबिरे सुरू

CD

रोह्यात मुख आरोग्य शिबिरे सुरू
जागतिक मुख आरोग्य दिनानिमित्त महिनाभर जनजागृती; विद्यार्थ्यांची तपासणी व मार्गदर्शन
रोहा, ता. २६ (बातमीदार) : जागतिक मुख आरोग्य दिनानिमित्त रोहा-अष्टमी नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात महिनाभर मुख आरोग्य जनजागृती व तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. २० मार्च रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली.
या शिबिरांत शालेय विद्यार्थ्यांची सविस्तर दंत तपासणी करण्यात येत असून, योग्य पद्धतीने दात घासण्याचे प्रात्यक्षिक, दंत संरक्षणाचे उपाय व प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जनजागृती व समुपदेशन सत्रेही घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना टूथब्रश व टूथपेस्टचे वितरण करण्यात आले.
पहिले शिबिर नगर परिषद शाळा क्रमांक ६ येथे ७० विद्यार्थ्यांसाठी, तर दुसरे शिबिर शाळा क्रमांक ९ येथे १२० विद्यार्थ्यांसाठी पार पडले. हा उपक्रम डॉ. अवनी डोईफोडे, डॉ. विरेंद्र एन., डॉ. साक्षी महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यावेळी राजेंद्र पोकळे, महेश कोलटकर, जयदेव पवार आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : जागतिक मुख आरोग्य दिनानिमित्त आयोजित शिबीर प्रसंगी डॉ. अवनी डोईफोडे, डॉ. वीरेंद्र एन, रोटरी क्लब अध्यक्ष राजेंद्र पोकळे,सभापती महेश कोलटकर आदी मान्यवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

Lonavala News : एकवीरा देवीचा पालखी सोहळा जल्लोषात; कार्ला गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी, उत्साहाला उधाण

Latest Marathi News Live Update : करमाळा शहरात इंधन टंचाई; एचपी पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे लागले फलक

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं सीक्रेट चॅट फीचर; मेसेज वाचल्यावर आपोआप होणार डिलीट, पाहा कसं वापरायचं?

SCROLL FOR NEXT