मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर

CD

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात
टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर

कासा, ता. २६ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा परिसरात मंगळवारी (ता. २४) भीषण अपघात झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. चार वाहनांची एकमेकांवर धडक झाल्याने हा अपघात झाला. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर एका टेम्पोचालकासमोर अचानक दुसरा टेम्पो आल्याने त्याने वाहनावरील नियंत्रण गमावले. समोरील टेम्पोला धडक देत टेम्पो वाचवण्याच्या प्रयत्नात तो समोरील गुजरात लेनमध्ये गेला. या वेळी समोरून येणाऱ्या एका चारचाकीसह इतर तीन वाहनांना टेम्पोची जोरदार धडक बसली.
अपघातात चारचाकीमधील जयश्री रेवडेकर (५८) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच वाहनचालक शिवनाथ रावत (२२), निर्मला पारकर (५३), धनश्री कवठाणकर (४५), राजेंद्र यादव (३८), वर्षा पारकर (८०) आणि स्वदेह प्रसाद (२२) हे प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

"माझ्या आई-बाबांनी आठवड्याभरात लग्न केलं" सोनालीने सांगितली तिच्या आई-वडिलांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT