क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
पोक्सोअंतर्गत कारवाई; आरोपीला न्यायालयीन कोठडी
टिटवाळा, ता. २६ (वार्ताहर) : क्रिकेटचे प्रशिक्षण देणाऱ्या कोचने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी क्रिकेट कोचला अटक केली असून, त्याच्याविरोधात बुधवारी (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार हा मुलीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आल्यानंतर उघड झाला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तत्काळ कल्याण तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संबंधित कोचला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित क्रिकेट कोचकडून त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या काही अल्पवयीन मुलींबाबत गैरवर्तन होत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्या दिशेनेही सखोल तपास केला जात आहे. दाखल तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला अटक करीत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल चोरगे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक आणि तत्पर भूमिका कायम ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.